भारतातील या दहा ठिकाणी सजतात सर्वात मोठे देह व्यापाराचे बाजार…

ज्या भारतात स्त्रियांना देवी म्हणुन ओळखलं जातं, त्याच भारतात स्त्रियांना आपला देहविक्रय करुन पोट भरावे लागते यांच्यासारखी भीषण वास्तवता नाही. एका बाजुला कामवासनेतुन बलात्कार करणाऱ्यांचे प्रमाण कमी करणाऱ्या या देहविक्रीच्या व्यवसायाला आजही समाजात अप्रतिष्ठित मानले जाते. परंतु आशिया खंडातील पहिले चार ते पाच रेड लाईट एरिया भारतात असणे यासारखी या व्यवसायाची चलती सांगणारी आकडेवारी पाहिली तर हा व्यवसाय किती चलती मध्ये आहे याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. पाहुया भारतातील टॉप १० रेड लाईट एरिया विषयी खासरेवर माहिती…

Loading...

१) सोनघाची (कोलकाता)
आशिया खंडातील हा सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे. इथं तब्बल ११००० हुन अधिक वेश्या आहेत. कोलकात्यातील शोभा बाजार परिसरात चित्तरंजन एव्हीन्यु भागात वेश्यांना व्यवसाय करण्यासाठी ऑलटाईम लायसन्स देण्यात आले आहे. इथल्या वेश्यांच्या रेट फक्त १२५ रुपयांपासुन सुरु होतो. १८ वर्षांच्या आतील मुलींचे प्रमाण इथे जास्त आहे.

३) कामाठीपुरा (मुंबई)
आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाचा हा रेड लाईट एरिया असुन भारतातील खुप जुना सुद्धा आहे. मुंबईतील ग्रांट रोड परिसरात हा भाग आहे. ब्रिटिश काळात सैनिकांच्या लैंगिक सुखासाठी ब्रिटिशांनी बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या आंध्र महिलांना या क्षेत्रात ओढले. मागच्या ३० वर्षांपुर्वी इथे ५०००० हुन अधिक वेश्या होत्या, परंतु जागेच्या कमतरतेमुळे बऱ्याच वेश्या इतरत्र गेल्या. मुंबईत डांसबार बंदीनंतर त्यांचे प्रमाण पुन्हा वाढले. इथल्या वेश्या २०० ते ५०० रुपये रेट घेतात.

Loading...

४) जी.बी.रोड (दिल्ली)
हा आशिया खंडातील चौथा मोठा रेड लाईट एरिया असुन इथे ५००० हुन अधिक वेश्या आहेत. मोगल काळापासुन इथे पाच वेगवेगळे रेड लाईट एरिया चालु होते, ब्रिटिशांनी ते सगळे एकत्र करुन जीबी रोड वर एका ठिकाणी आणले. इथल्या वेश्या ३०० रुपयांपासुन रेट घेतात.

५) रेशमपुरा (ग्वाल्हेर)
NH3 हायवेवरील रेशमपुरा या रेड लाईट एरियातील मुलींना डांसबरचे प्रशिक्षण दिले जाते. संपुर्ण गावात वेश्यावस्ती आहे. इथल्या एरियात विदेशी मुली, मॉडेल आणि कॉलेज युवती कॉलगर्लचे प्रमाण जास्त आहे. इथे मासिक पगारावर वेश्याव्यवसाय करणाऱ्या वेश्या आढळतात.

६) मीरगंज (अलाहाबाद)
हा दीडशे वर्ष जुना रेड लाईट एरिया असुन स्वातंत्र्यपुर्व काळात इथे मुजरा चालायचा. आता हायकोर्टाच्या आदेशानुसार इथला रेड लाईट एरिया हटवण्यात आला आहे. भारताचे पहिले प्रधानमंत्री नेहरुंचा जन्म याच भागात झाला होता असे सांगितले जाते, परंतु त्याचे कुठलेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.

७) गंगा जमुना (नागपुर)
हा रेड लाईट एरिया १०० वर्ष जुना असुन इथे ३००० हुन अधिक वेश्या आहेत. गुन्हेगारी आणि मानवी तस्करीसाठी हे ठिकाण बदनाम आहे. गंगा आणि जमुना या नावाच्या दोन डांस बारगर्ल मुळे या एरियाला हे नाव मिळाल्याचे बोलले जाते. इथल्या वेश्या २०० रुपयांपासुन रेट घेतात.

८) शिवदासपुर (वाराणसी)
हिंदूंचे पवित्र स्थळ असणाऱ्या वाराणसी शहरातील या भागात पूर्वी नाचगाण्याचे कार्यक्रम चालायचे. नंतर वेश्याव्यवसायाने इथे चांगलाच जोर धरला होता. २००५ मध्ये पोलिसांची मोठी रेड पडल्यानंतर इथल्या वेश्याव्यवसायाला उतरती कळा लागली. एड्सच्या भीतीने कस्टमर फिरकत नसल्याने इथला वेश्याव्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

९) चतुर्भुज स्थान (बिहार)
भारत-नेपाळ सीमेवर असणाऱ्या या रेड लाईट एरियात मोगल काळापासुन वेश्याव्यवसाय चालतो. हा इथला पारंपरिक व्यवसाय असुन इथे ३५०० हुन अधिक वेश्या व्यवसाय करतात.

१०) कबाडी बाजार (मेरठ)
उत्तरप्रदेशातील मेरठ शहरातील हा रेड लाईट एरिया इंग्रजकाळापासुन सुरु आहे. नेपाळी मुली पुण्यानंतर जास्त संख्येने इथे आढळतात.

वरील माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका…
आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वेश्या वस्ती बुधवार पेठ बद्दल संपूर्ण माहिती

Loading...

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *