जाणून घ्या जास्तीत जास्त विमानांचा रंग पांढराच का असतो…

तुम्ही कधी विमानाने प्रवास केला आहे का? नसेल केला तरी तुम्ही विमान नक्की पाहिलं असेल. विमानांच्या बाबतीत एक असे खास वैशिष्ट्य बघायला मिळते ज्यावर तुम्ही कधी लक्ष नसेल दिलं. आज आपण विमानाच्या याच खास गोष्टीविषयी माहिती बघणार आहोत. या गोष्टीचा तुम्ही यापूर्वी कधी विचार केला असेल असे वाटत नाही. आज आपण बोलत आहोत विमानाच्या रंगाविषयी. जगभरातील जास्तीत जास्त विमानांचा रंग हा पांढरा असतो. विमानांचा रंग पांढरा असण्यामागे एक कारण आहे. जाणून घेऊया हे कारण खासरेवर…

Loading...

पांढऱ्या रंगाचा वापर विमानाला थंड ठेवण्यासाठी केला जातो. कारण पांढरा रंग इतर रंगाच्या तुलनेत गर्मीला दूर ठेवतो. काळा रंग हा उष्णतेला पूरक रंग आहे. काळ्या रंगामुळे उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते. विमानांची विशेष काळजी घेणे सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे असते. त्यासाठी सुद्धा पांढरा रंग महत्वपूर्ण आहे. कारण पांढऱ्या रंगामुळे विमानात झालेली खराबी जसे की क्रेक्स, तेल किंवा ऑइल लिकेज लवकर कळते. याशिवाय विमानाला रंग देण्यास 3 लाख ते 1 कोटी रुपये खर्च येतो. पांढऱ्या ऐवजी दुसऱ्या रंगाने हाच कलर द्यायचं म्हटलं तर कंपनीला खूप जास्त खर्च करावा लागू शकतो. विमानाला रंग देण्यास 3-4 हप्त्याचा कालावधी लागतो. कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागू शकते. त्यामुळे सुद्धा विमानाला पांढरा रंग देणे फायद्याचं आहे.

खरंतर विमानाच्या कंपन्या नेहमी आपल्या विमानाची खरेदी विक्री करत असतात. पांढऱ्या रंगामुळे विमानावरील नावं सोप्या पद्धतीने बदलली जाऊ शकतात. एवढेच नव्हे तर पांढरा रंग हा इतर रंगाच्या तुलनेत वजनाने हलका असतो. त्यामुळे इतर वजनाच्या तुलनेत पांढरा रंग वापरल्यास विमानाचे वजन थोडे कमी राहण्यास मदत होते. पांढऱ्या ऐवजी दुसरा रंग वापरला तर विमानाचे वजन वाढून पेट्रोल थोडं जास्त प्रमाणात लागू शकते. 6यामुळे सुद्धा विमानाचा रंग पांढरा असतो.

Loading...

अजून एक कारण म्हणजे, इतर रंग हे उन्हात फिकट होऊ लागतात. पण पांढऱ्या रंगाच्या बाबतीत हे घडत नाही. त्यामुळे विमान कंपन्या या पांढरा रंग वापरणे पसंत करतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
भिवंडीतील मराठी माणसाने घेतली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वापरणारी आलिशान कार

Loading...

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *