पुण्यात नवीन असलेल्या किंवा पुण्यात पहिल्यांदाच येणाऱ्या लोकांसाठी काही महत्वाची माहिती

पुणे तिथे काय उणे हे सर्वांनी एकलेच असेल. परंतु याच पुणेमध्ये गेल्यावर नवीन माणसाची जी तारंबळ उडते त्यापासून वाचण्याकरिता आम्ही खासरेवर काही टिप्स देणार आहोत. एकदा आम्ही माझ्या एका कोल्हापूरच्या बहिणीला तुळशीबागेत खरेदीसाठी घेऊन गेलो होतो. दिढ-दोन तास संपूर्ण तुळशीबाग पालथी घालून झाल्यावर तिने खूपच निरागसपणे विचारलं, ” ते न्हवे, दोन तास झालं फिरतोय आपण तुळशीबागेत, खरं बाग कुठं दिसली नाही की? पुणेमधील नवीन असलेल्या किंवा पुण्यात पहिल्यांदाच येणाऱ्या लोकासाठी काही महत्वाच्या टिप्स कामी पडतील हे नक्की आहे…

Loading...

१. तुळशीबाग म्हणजे कोणतीही बाग नसून, स्त्रियांचं सगळ्यात आवडत ‘shopping with bargaining destination’ आहे. २. अलका चा चौक म्हणजे तो कोणत्याही अलका नावाच्या बाईचा चौक नसून त्या चौकात अलका टॉकीज आहे म्हणून त्याला अलका चा चौक म्हणतात. ३. F.C. College road हे खूप चुकीचं आहे. F.C. मधला C हा College साठीच आहे, उगाच परत ज्यादाच college लावायची गरज नाही. नुसतं F.C road म्हणायचं. ४. वैशाली, वाडेश्वर, रूपाली, गुडलक, काटाकीरला जर का खायला जायचं असेल, तर किमान दोन तास आधी जाऊन थांबणे आणि टेबल मिळाला की उगाचंच आपण खूपच मोठी मोहीम फत्ते केली आहे असं फीलिंग घेयचं असत. ५. सोन्या मारुती, पत्र्या मारुती म्हणजे काय ते मारुती सोन्याचे किंवा पत्र्याचे आहेत असं अज्जिबात नाही. ६.सिंहगडावर सिंह दिसतात का ? अस काही पण विचारू नये, इतिहास नीट वाचून येणे. ७. बिकानेर किंवा कोणत्या अन्य ब्रँडची बाकरवडी शोधण्याची हिम्मत इथे स्वप्नात सुद्धा करू नये.

८. बाणेर आणि सुस रोडवरून फिरताना फुक्कट भारी फील करून घेयचं असत. ९. CPK म्हणजे CKP चा काही संबंध नाही. CPK म्हणजे CITY PRIDE KOTHRUD. आता उगाच CITY PRIDE सातारा रोड, सिंहगड रोड चे शॉर्ट फॉर्म्स करत बसू नये, आम्ही जे शॉर्ट फॉर्म्स ठरवले आहेत तेच वापरणे, जसे की ABC म्हणजे अप्पा बळवंत चौक.

Loading...

१०. K. P अर्थात कोरेगाव पार्क मध्ये जर तुम्ही हँग आऊट करत असाल तर स्वतःला खूप मॉडर्न, श्रीमंत, आणि हाय स्टँडर्ड समजायचं असतं. ११. पर्वती नावाची टेकडी आहे, तिला ‘पार्वती’ असं म्हणू नये आणि हो त्या टेकडीवरून संपूर्ण पुणं दिसतं ह्या अपेक्षेने जाऊ नये. खूप पूर्वी दिसायचं, आता फक्त वरून घाणंच दिसतें. १२. कॅम्प नावाचं खूप मोठ आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. शाळा आणि कॉलेज मध्ये जो कॅम्प असतो त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. मी कॅम्प मध्ये जातोय हे ऐकल्यावर उगाच बुचकळ्यात पडू नये. १३. आज भरतला प्रयोग आहे म्हणजे भरत नाट्य मंदिरात प्रयोग आहे, भरत नावाच्या माणसाचा काही संबंध नाही. १४. Relax मध्ये कधीच Relax बसून देत नाहीत.

१५. नारायण पेठ आणि सदाशिव पेठेची गुणवैशिष्ठे एकसारखी असली तरी there is a thin line of geographical difference between these two. नारायण पेठ संपून सदाशिव पेठ कुठून सुरू होते हे पक्क्या पुणेकरांच समजतं. १६. पुण्यात आलात आणि सुजाता मस्तानीची आंबा मस्तानी प्यायली नाहीत तर आयुष्य व्यर्थ गेलंय असं समजा. १७. ABC मधलं किबे थिएटर हे कायम ‘प्रभात टॉकीज’ म्हणूनच ओळखल जाणार. १८. पुण्यात नवीन असाल तर बोहरी आळीत, रविवार पेठेत चुकून सुद्धा चारचाकी घेऊन जाऊ नये. तुम्ही इथे चालायचा प्रयत्न जरी केलात तरी खूप आहे.

Source festivalsherpa

१९. दारुवाला पुलावर दारू मिळत नाही, उगाच मनात खोट्या आशा बाळगून तिकडे जाऊ नये. २०. बुधवार पेठे विषयी नवीन लोकांना आधीच माहिती असत सगळं. बुधवार पेठ ऐकल्यावर उगाच विचित्र हावभाव देऊ नये. दगडूशेठ गणपती मंदिर पण तिथंच आहे. २१. आणि खूप खूप महत्त्वाची गोष्ट : पिंपरी, चिंचवड पुण्यात येत नाही. २२. वेड्यांचे इस्पितळ आणि जेल हा येरवड्याचा एक भाग आहे. येरवड्याला चला म्हंटल्यावर उगाच घाबरून जाऊ नये. २३. संतनगर वगैरे ठिकाणी गेलात तर तिकडे सगळी संत वृत्तीची माणसे भेटतात या भ्रमात राहू नये. ( असे लोक पुण्यात भेटणे कठीण असते.) हे सोसायट्यांच्या किंवा जमीनदारांच्या नावावरून पडलेले पुण्याचे भाग आहेत. २३. आणि ही एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा की चितळ्यांकडून तूप, बासुंदी घेयची असेल तर घरून डबा ( डब्बा नव्हे ) घेऊन जाणे. तिथे जाऊन वाद घातलात तर अपमान होतो . २४. लक्ष्मीनारायण चा ताजा चिवडा, कयानी बेकरी चे ताजे पदार्थ, कांताबेन ची ताजी सुरळीवडी हवे असतील तर रांगेत उ हे राहण्याशिवाय पर्याय नसतो हे लक्षात ठेवावे. उगाच रंग बघून कपाळावर आठ्या चढवून इतरांचा मूड घालवायचा नसतो.

२५. बस मध्ये मुलींनी एक अलका एक अल्पना असे सांगून तिकीट घेतले तर आपले नाव सांगून तिकीट मिळते असा विनोदी समज करून घेऊ नये.इथल्या बस स्टॉप लाच फक्त अशी गोड नावे असतात. २६. बचबचा तिखट कोंबलेल्या इतर शहरातल्या मिसळींची पुण्याच्या मिसळीशी तुलना करू नये. इथे मिसळ खाऊन घामाघूम होण्यापेक्षा चवीचा आस्वाद घेतात.

अश्या अजून काही गोष्टीं तुम्हाला सुचल्या तर नक्कीच नमूद करा.. माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वेश्या वस्ती बुधवार पेठ बद्दल संपूर्ण माहिती

Loading...

Comments

comments

One Comment on “पुण्यात नवीन असलेल्या किंवा पुण्यात पहिल्यांदाच येणाऱ्या लोकांसाठी काही महत्वाची माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *