भिवंडीतील मराठी माणसाने घेतली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वापरणारी आलिशान कार

अमेरिकन बनावटीची कॅडिलॅक एस्केलेड ही आलिशान गाडी भारतात दाखल झाली असून भारतात पहिली गाडी घेण्याचा मान एका मराठी माणसाला मिळाला आहे. भारतातील बॉलीवूड स्टार्स आणि अनेक बड्या उद्योगपतींनी या गाडीचं बुकिंग केले आहे. परंतु पहिली गाडी महाराष्ट्रातील एका मराठी माणसाच्या दारी आहे. भिवंडीतील अरुण पाटील यांनी ही बलाढ्य आणि अतिशय आकर्षक एस्केलेड गाडी खरेदी केली आहे.

Loading...

जाणून घेऊया कॅडिलॅक एस्केलेड विषयी-

कॅडिलॅक एस्केलेड ही अत्यंत आलिशान आणि बलाढ्य गाडी आहे. ही गाडी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वापरतात. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या ताफ्यातील ही एक महत्वाची गाडी मानली जाते. खास राष्ट्रध्यक्षांसाठी या गाडीची निर्मिती करण्यात येते. या गाडीमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोणाने अनेक सुविधा दिलेल्या आहेत. अत्यंत भव्य दिव्य दिसणारी ही गाडी विमानात असणाऱ्या सोयीसुविधांनी परिपुर्ण आहे. गाडीमध्ये बसल्यानंतर माणसाला एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलचा अनुभव घेता येतो. फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा सुद्धा जास्त सुविधा या गाडीमध्ये आहेत असं बोललं तर वावगं ठरणार नाही. या गाडीमध्ये ट्रायझोन क्लायमेट कंट्रोल, विशिष्ट लेदरचे सुव्यवस्थित सीट, लाकूड आणि लेदर ची मिळून स्टीअरिंग, क्रुज कंट्रोल रिमोट इंजिन यासह असंख्य प्रिमियम सोयीसुविधा दिलेल्या आहेत.

खास व्हीव्हीआयपी लोकांसाठी बनवण्यात येणाऱ्या या गाडीची किंमत सुद्धा तशीच आहे. कॅडिलॅक एस्केलेड या जमिनीवरील चारचाकी विमानाची किंमत तब्बल 5.23 कोटी आहे.

Loading...

सर्व सेलिब्रिटी आणि बड्या उद्योगपतींना मागे टाकून एका मराठी माणसाने ही गाडी खरेदी केल्याने सर्वत्र त्यांचं कौतुक होताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे संपूर्ण भारतात ही गाडी सर्वप्रथम महाराष्ट्रात आणि मराठी माणसाच्या दारी आली आहे.

अरुण पाटील यांचे खासरेकडून मनःपूर्वक अभिनंदन. या मराठी माणसाची अभिमानास्पद कामगिरीची माहिती आवडल्यास नक्की शेअर करा आणि आमचे खासरे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
पाकिस्तानी जैलमधून पळ काढणाऱ्या भारतीय वैमानिकाची चित्तथरारक कथा..
शिखच का असतात सर्वात जास्त ट्रक ड्रायवर? बघा यामागील कारण खासरेवर

Loading...

Comments

comments

2 Comments on “भिवंडीतील मराठी माणसाने घेतली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वापरणारी आलिशान कार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *