लावणी, कुस्ती, जनावरांचा बाजार व खूप काही भारतातील दोन नंबरची सर्वात मोठी यात्रा

खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रदेशातील बहुसंख्य जनतेचे कुलदैवत आहे. मल्लारी, मल्लारीमार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ अशी नावे असलेल्या खंडोबारायाची महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण बारा स्थाने आहेत. नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळेगाव हे एक तीर्थक्षेत्र आहे. खंडोबाच्या यात्रांमध्ये मोठी यात्रा माळेगावच्या खंडोबाची यात्रा आहे. माळेगावची यात्रा सुप्रसिद्ध असून यावेळी भरणार गुरांचा बाजार हा भारतातील दोन नंबरचा सर्वात मोठा गुरांचा बाजार आहे. चला तर आज खासरेवर बघूया माळेगाव यात्रा विशेष

Loading...

मार्गशीर्ष अमावास्येपासून सुरू होणारी यात्रा ८-१० दिवस जोमाने सुरू असते. लोहा, कंधार, अहमदपूर, लातूर, नांदेड या भागासह आंध्र, कर्नाटक राज्यातूनही यात्रेकरू मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. समाजातील गारुडी, वैदू, कैकाडी, चुडबुडकेवाले आदी सर्व जाती-जमातींचे नागरिक आवर्जून हजेरी लावतात. यात्रेला ३०० वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री, शर्यती, प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीत वाद्य, लोकनाट्य असे विविध कार्यक्रम स्थानिक समितीच्या सहकार्याने आयोजित केले जातात. पूर्वी तीन-तीन महिने माळेगावची यात्रा भरत असे.

मार्गशीर्षअमावास्या चतुर्दशी हे यात्रेचे मुख्य दोन दिवस मानले जातात. या दिवशी खंडोबाचे भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिरासमोर जवळपास एक ते दीड किलोमीटर लांब रांग लागते. दरवर्षी जवळपास ५०-६० हजार भाविक रांगेत दर्शनासाठी उभे असतात. माळेगाव यात्रा उत्कृष्ट प्रतीच्या पशुधनाच्या व्यापारासाठी देशात प्रसिध्द आहे. नांदेडचे स्थानिक लाल कंधारी वळू हे पशुप्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असते. आग्रा, जयपूर, मथुराचे घोडे काठेवाडी,मारवाडी, अरबी आदी जातीचे घोडे आहेत. जयपूर, मथुरा, आग्रा, बरेली, पंजाब या प्रांतांतून घोडे विक्रीसाठी आले आहेत. याच भागातून घोड्यांचे शौकिनही खरेदीसाठी आले आहेत. घोड्यांची किंमत लाखाहून अधिक आहे. या ठिकाणी घोड्यासोबत ऊंट, गाय, बैल, म्हैस, रेडे, गाढव, शेळ्या मेंढे, अस्वल, माकड, वानर, कुञे, ससे, कासव, कोंबडे आदी पाळीव व उपयोगी पशुपक्षी आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड आदी राज्यातून लोक खरेदी विक्रीसाठी येतात.

Loading...

यात्रेतील बाजार हे पर्यटकांचे आकर्षण आहे. मूर्ती, छायाचित्रे, लाकडी खेळणी, कोसल्याचा पटका, शेला, पागोटी, जाड धोतर, घोंगडी, घोड्याचा साज, इतर प्राण्यांसाठी लागणार्‍या म्होरकी, कासरा, गोंडे, घुंगरू, घागर माळा, तोडे, वेसण, खोबळे, खोगीर, लगाम यांसारख्या अनेक वस्तूंनी बाजारपेठ फुलते. जत्रेत कित्येक कोटींचा व्यापार होतो. मोठमोठ्या राजकीय व्यक्ती त्यांच्या त्यांच्या खास अशा घोड्यांसोबत पाहावयास मिळतात. सुग्या-मुग्यांची यात्रा, हौसे-गवसे-नवशांची यात्रा, तृतीयपंथीयांचे माळेगाव, उचल्यांचे माळेगाव अशा विविध प्रकारे माळेगाव यात्रेचा उल्लेख होतो. याला ‘हिजड्यांचे माळेगाव’ असेही म्हणतात.

माळेगावपासून २० किलोमीटरवर रिसनगाव येथील नाईक कुटुंबाकडे माळेगावच्या पालखीचा मान आहे. कंधारजवळील भोसी येथील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोट्याचा मान आहे. चंपाषष्टीच्या दिवशी भोसीकर कुटुंब आपले पागोटे घेऊन माळेगावला येतात. ते पागोटे मार्गशीर्ष अमावस्येच्या यात्रेपर्यंत मंदिरात ठेवतात. आजही भोसीकर कुटुंबीय चंपाषष्टीपासून अमावस्येपर्यंत पागोटे वापरत नाहीत. वाय खंडोबाच्या पालखीचा मान हा रिसनगाव येथील नाईक कुटुंबाकडे आहे. नागोजी नाईकांपासून सुरू झालेली ही परंपरा नानासाहेब नाईक, बापूसाहेब नाईक, भाऊसाहेब नाईक, हैबतराव नाईक, मल्हारराव नाईक, गणपतराव नाईक यांनी समर्थपणे सांभाळली. आता ही परंपरा संजय नाईक हे चालवत आहेत.

जत्रेबद्दल एक लोककथा आहे, ती अशी- बिदरचा एक वाणी तांदळाचा व्यापार करत असे. तो मजल-दरमजल करत माळेगावला आला व तिथेच त्याचा मुक्काम पडला. त्याच्यासोबत तांदळाच्या गोणी पाठीवर असलेली गाढवे होती. दुसर्‍या दिवशी पुढच्या प्रवासाला निघताना एका गाढवाच्या पाठीवरील गोण फार जड वाटू लागली. ती जेव्हा सोडून पाहण्यात आली तेव्हा ती मध्ये दोन तांदूळ सापडले. ते अंगठ्याएवढे मोठे होते. ते तांदूळ म्हणजेच खंडोबा व त्याची पत्नी म्हाळसा. त्यांची प्रतिष्ठापना तिथेच केली गेली. तेव्हापासून जत्रा भरत आलेली आहे. जत्रेचे संयोजन कंधार पंचायत समिती व नांदेड जिल्हा परिषद यांच्याकडे १९६८ सालापासून आले.

येळकोट येळकोट sss जय मल्हार!! शिवा मल्हारी येळकोट येळकोट घेsss माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Loading...

Comments

comments

One Comment on “लावणी, कुस्ती, जनावरांचा बाजार व खूप काही भारतातील दोन नंबरची सर्वात मोठी यात्रा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *