नवाजूद्दीन सिद्दिकी नाहीतर हा अभिनेता साकारणार बाळासाहेबांची भूमिका…

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील चित्रपट आज लॉन्च होणार आहे. ‘सरकार’ सिनेमात बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावरुन प्रेरणा घेत भूमिका साकारणारे अमिताभ बच्चन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा चित्रपट लॉन्च करणार आहेत. हा चित्रपट हिंदी भाषेत बनणार आहे.

Loading...

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील बायोपिक सिनेमात नवाजुद्दिन सिद्दिकी बाळासाहेबांच्या भूमिकेत झळकणार अशी चर्चा इतके दिवस रंगत होती. नवाझुद्दीनच्या आधी या व्यक्तीरेखेसाठी अक्षय कुमार आणि इरफान खानच्या नावावर विचार केला होता.” परंतु आता नवीन नाव पुढे आले आहे. ‘साहेब’ असं या बायोपिकचं नाव आहे. स्मिता ठाकरे यांनीही 2015 मध्ये बाळासाहेबांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. त्यांचा मुलगा आणि बाळासाहेबांचे नातू राहुल ठाकरे यांच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु उद्धव ठाकरे यांच्या विरोधानंतर हा चित्रपट बनला नाही. आता राज्यसभेचे खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत चित्रपटाची निर्मिती करणार असून, अभिजीत पानसे दिग्दर्शक असतील. संजय राऊत यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे. त्यांना यासाठी चार वर्ष लागली.

अजय देवगण बाळासाहेबांची भूमिका साकारणार अशी चर्चा जोर धरत आहे. एका वेबसाईटच्या वृत्तानुसार बाळासाहेबांची भूमिका बॉलिवूडचा लाडका सिंघम अजय देवगण वठवणार अशी चर्चा आहे. आज संध्याकाळी अमिताभ बच्चन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा चित्रपट लाँच करणार आहेत. या सिनेमाचं नाव ‘साहेब’ आहे असं समजतंय. नवाजुद्दिन सिद्दिकीचं नाव गेल्या काही दिवसांत डागाळलंय ते ‘अॅन ऑर्डिनरी लाईफ’ या त्याच्या आत्मचरित्रामुळे. अभिनेत्री निहारिका सिंगसोबत विवाहबाह्य संबंध, न्यूयॉर्कच्या वेट्रेससोबत अनैतिक संबंध आणि अनेक बाबींमुळे नवाजुद्दिन सिद्दीकीवर अनेकांनी ताशेरे ओढले. खुद्द त्याच्या तथाकथित प्रेयसी सुनीता राजवर आणि निहारिका सिंग यांनीही या पुस्तकातील नवाजुद्दिनचा खोटेपणा उघडकीस आणला त्यानंतर नवाजुद्दिनला हे पुस्तक रद्द देखील करावं लागलं.

या सगळ्या प्रकारानंतर बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी तो योग्य नाही म्हणून बाळासाहेबांच्या बायोपिकमधून त्याचं नाव वगळण्यात आल्याचं कळतंय. पण बाळासाहेबांच्या भूमिकेत अजय देवगण की आणखी कुणी यावरील पडदा आज चित्रपटाच्या लाँचलाच उघडणार आहे.
परदेशी पर्यटक भारतात येतात तेव्हा काय घडते नक्की वाचा..

Loading...
Loading...

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *