बजाज लवकरच घेऊन येत आहे तुमची फेवरेट सुपरबाईक, बघा काय असणार किंमत…

दुचाकी वाहन निर्मिती क्षेत्रात अग्रगण्य असणारी बजाज कंपनी आपल्या नवीन पल्सर 400 c. c. 4 स्ट्रोक गाडीवर काम करत आहे. या नवीन बाईकमध्ये इंजिन डी. ओ. एच. सी. लेआऊट सोबत येणार आहे. तुम्हाला प्रश्न पडेल हे लेआऊट नेमकं काय आहे तर डी. ओ. एच. सी. म्हणजे डबल ओव्हर हेड कैमशाफ्ट. बजाज कडे सध्या 373 c. c. चे इंजिन आहे जे की बजाज डोमिनोर 400 मध्ये लावलेले आहे. यामध्ये सिंगल ओव्हरहेड कैमशाफ्ट चा वापर केला गेला आहे. नव्या 400 c.c. बाईकमध्ये चार व्हॉल्व, लिक्विड कुलिंग, फ्युएल इंजेक्शन आणि ट्रिपल स्पार्क प्लेग दिले जाणार आहे. या नवीन मोटरसायकलमध्ये इंजिनला 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत जोडले जाणार आहे.

Loading...

यापूर्वी 373 cc चे हे इंजिन केटीएम ड्युक गाडीमध्ये वापरले गेले आहे. सध्या बजाजचे हे इंजिन कधी लाँच होणार याविषयी माहिती समोर आली नाहीये. नवीन लाँच होणाऱ्या या बाईकची किंमत 1.7 लाख च्या जवळपास असणार आहे. या गाडीची टिव्हीएस च्या नवीन अपाचे सोबत स्पर्धा असणार आहे.

बजाज पल्सर सीएस 400 बऱ्याच वेळा टेस्टिंग करताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पण लवकरच ही बहुप्रतिक्षित बाईक भारतीय बाजारात दाखल होणार आहे. सीएस 400 बजाजची सर्वात मोठी डिस्प्लेसमेंट मोटरसायकल आहे.सीएस 400 बजाजच्या पोर्टफोलिओ साठी खूप महत्त्वाची बाईक आहे. बजाज 400 एक टूअरर बाईक ठरू शकते. टिव्हीएस अपाचे सोबतच पल्सरची स्पर्धा महिंद्राच्या मोजो सोबत सुद्धा होणार आहे.

Loading...

या पावरफुल बाईकमध्ये प्रीमियम स्पेसिफिकेशन असण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे पल्सर 400 मध्ये इन्स्ट्रुमेंट कलस्टर, फ्युल टॅंकवर एलसीडी डिस्प्ले, ऍलोय व्हील आणि मोनोशॉक रिअर सस्पेंशन सारखे फीचर्स सुद्धा आहेत. ही बाईक 2014 मध्ये सादर झाली होती, पण आता अनेक बदलांसह ती लाँच होईल अशी अपेक्षा आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
अधिक वाचा: रितेशला बायकोकडून बर्थडे गिफ्ट मिळाली टेस्ला सुपरकार,संपूर्ण भारतातील दुसरी टेस्ला
अधिक वाचा: भेळचा गाडा टाकून केली सुरवात, आज आहे कोट्यवधींचा मालक..

Loading...

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *